Mumbai : चेंबूरमध्ये सोमवारी पाणीपुर‌वठा विस्कळीत; अमर महल ते तुर्भेदरम्यान जलबोगद्याचे काम होणार, पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन 
मुंबई

Mumbai : चेंबूरमध्ये सोमवारी पाणीपुर‌वठा विस्कळीत; अमर महल ते तुर्भेदरम्यान जलबोगद्याचे काम होणार, पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन

मुंबई महापालिकेकडून अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय दरम्यानच्या जलबोगद्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेकडून अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय दरम्यानच्या जलबोगद्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, १८ मे रोजी सकाळी १० ते रात्री १० या १२ तासांच्या कालावधीत ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पालिका प्रशासनाने रहिवाशांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे तसेच काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.

एम-पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४६, १४७ आणि १४८ तसेच एम पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १५४ व १५५ मधील नागरिकांनी १८ मे ते २५ मे या सात दिवसांच्या कालावधीत पाणी गाळून आणि उकळून वापरावे, अशी खबरदारीची सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे.

या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम!

एचपीसीएल रिफायनरी व वसाहत, वरुण बेवरेजेस, बीएआरसी, गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी परिसर, बीपीसीएल वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आरसीएफ वसाहत, भारतनगर, जे प्लॉट, हशू अडवाणीनगर, आणिक गाव, एमईसीबी वसाहत, सह्याद्रीनगर, आरएनए उद्यान, म्हाडा इमारती, रॉकलाइन इमारती, विष्णूनगर, व्हिडीओकॉन इमारती, एसजी केमिकल इमारती, प्रयागनगर, ओम गणेशनगर, राहुलनगर आणि अशोकनगर या भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

‘एम पश्चिम’ विभागातील बाधित भाग

एमएस इमारती १ ते ३२, बीपीटी, इंडियन ऑईल, टाटा पॉवर, एजीस केमिकल, भारत पेट्रोलियम, आरसीएफ लिमिटेड, चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमननगर, भक्ती भवन, चिखलवाडी, समर्थनगर, बसंत पार्क, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरानगर, गोल्फ क्लब परिसर, रामटेकडी, तोलाराम टॉवर, कोकणनगर, गणेशनगर, विजयनगर, अशोकनगर, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मरवली चर्च, आरसी मार्ग, माहूल गाव, आंबापाडा, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, वाडवली, लक्ष्मीनगर, जिजामातानगर, रमाबाई वसाहत, महात्मा फुलेनगर, अजंठा वसाहत, मुकुंदनगर, पंजाबी चाळ, नागेवाडी, छेडानगर यात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

अनधिकृत जलजोडण्यांवर कारवाई; मुंबईत विशेष मोहीम राबविण्यात येणार, अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई

Thane : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

Pune : यंदा माऊलींचा रथ 'हायटेक'; वजन केले एक टनाने कमी

...तर मतदानावरील विश्वास उडेल; आमदार रोहित पवार यांची भीती

मुंबईत तीन वर्षांत झाडे व फांद्या कोसळून १२ जणांचा मृत्यू, १२५ जण जखमी; चेंबूर येथील दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर