Mumbai : वांद्र्यात कारच्या धडकेत मुलाचा मृत्यू  
मुंबई

Mumbai : वांद्र्यात कारच्या धडकेत मुलाचा मृत्यू

वांद्रे पश्चिम येथे रविवारी रस्ता ओलांडताना कारच्या धडकेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई : वांद्रे पश्चिम येथे रविवारी रस्ता ओलांडताना कारच्या धडकेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहन चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. अपघाताच्या वेळी महिला मोबाईलवर बोलत असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. मात्र, या आरोपाची तपासादरम्यान स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मृत मुलाचे नाव अंश गुप्ता असून, आरोपी कारचालक महिलेचे नाव मेघा रावल (४५) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानासमोर, माऊंट मेरी चर्चच्या दिशेने जाणाऱ्या सेंट जॉन बॅप्टिस्ट रोडवर हा अपघात झाला. अंश खेळून घरी परतण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्याला कारने धडक दिली. एका रिक्षाचालकाने जखमी अंशला उचलून रिक्षात ठेवले आणि तातडीने वांद्रे पश्चिम येथील होली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी सुमारे ३.४५ वाजता त्याला मृत घोषित केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका