कोस्टल रोडच्या मेलडी रोडवर रात्रीच्या वेळेत बॅरिकेडिंग 
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडच्या मेलडी रोडवर रात्रीच्या वेळेत बॅरिकेडिंग; तक्रारीनंतर पालिकेने उचलले पाऊल; रहिवाशांना दिलासा

धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता प्रकल्पावरील (दक्षिण) संगीतमय मार्ग (मेलडी रोड) बंद करण्यात आलेला नाही किंवा काढून टाकलेला नाही. तर, रात्रीच्या वेळी या ५०० मीटर भागापुरती बॅरिकेडिंग करण्याचे ठरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वेळेत या मार्गावरून नियमितपणे वाहतूक सुरू राहील.

Swapnil S

मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता प्रकल्पावरील (दक्षिण) संगीतमय मार्ग (मेलडी रोड) बंद करण्यात आलेला नाही किंवा काढून टाकलेला नाही. तर, रात्रीच्या वेळी या ५०० मीटर भागापुरती बॅरिकेडिंग करण्याचे ठरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वेळेत या मार्गावरून नियमितपणे वाहतूक सुरू राहील. तसेच परिसरातील रहिवाशांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी केली असता या ठिकाणी आवाज हा निर्धारित डेसिबल मर्यादेत असल्याचे आढळून आले आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता प्रकल्पावरील (दक्षिण) संगीतमय मार्गाबाबत (मेलडी रोड) विविध प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रकाशित-प्रसारित होत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) येथील उत्तरवाहिनी मार्गिकेवर बोगद्याबाहेर पडणाऱ्या मार्गावर ५०० मीटर लांबीचा मेलडी रोड तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांना वाहन चालवताना या रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धूनचा आस्वाद घेता यावा व करमणूक व्हावी, या उद्देशाने हा रस्ता विकसित करण्यात आला. मात्र, रात्रीही गाड्यांची ये-जा सुरू असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत होता.

रहिवाशांना रात्रीचा त्रास

या संगीतमय मार्गावरून वाहने धावत असताना निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळे त्रास होत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाला कळवले होते. स्थानिक रहिवाशांची मागणीच्या अनुषंगाने, रहिवाशांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन संगीतमय मार्गावर निर्माण होणारा ध्वनी हा निर्धारित डेसिबल मर्यादेत असल्याची खात्री करण्यात आलेली आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण