नाना-नानी पार्कमधील आणखी ३० झाडांचा बळी; पवईत स्थानिकांचा विरोध; आरामनगरमध्ये जागेचा शोध; शनिवारी रहिवाशांचे पुन्हा आंदोलन 
मुंबई

नाना-नानी पार्कमधील आणखी ३० झाडांचा बळी; पवईत स्थानिकांचा विरोध; आरामनगरमध्ये जागेचा शोध; शनिवारी रहिवाशांचे पुन्हा आंदोलन

मुंबई किनारी रस्ता उत्तर प्रकल्पासाठी वर्सोवा येथील नाना-नानी पार्कमधील ४४ झाडांची कत्तल करण्यात आली असतानाच, पुनर्रोपणासाठी प्रस्तावित असलेली आणखी ३० झाडे हलविण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या झाडांच्या पुनर्रोपणासाठी पवई आणि पनवेल येथे दोन जागा निश्चित करण्यात आल्या होत्या.

Swapnil S

मुंबई : मुंबई किनारी रस्ता उत्तर प्रकल्पासाठी वर्सोवा येथील नाना-नानी पार्कमधील ४४ झाडांची कत्तल करण्यात आली असतानाच, पुनर्रोपणासाठी प्रस्तावित असलेली आणखी ३० झाडे हलविण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या झाडांच्या पुनर्रोपणासाठी पवई आणि पनवेल येथे दोन जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी यंदा मे महिन्यात महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरीही मिळाली होती. मात्र, पवईतील जागेवर स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने महापालिकेची अडचण झाली असून, आता वर्सोव्यातील आरम नगर परिसरात पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील जागा उपलब्ध असल्याने तेथे पुनर्रोपणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचवेळी अंधेरी परिसरात आणखी एक जागा निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नाना-नानी पार्कमधील ४४ मोठ्या झाडांच्या कत्तलीनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उर्वरित ३० झाडे पुनर्रोपणासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महापालिका काही काळ थांबण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या नोंदीनुसार, या प्रकल्पामुळे एकूण ८९ झाडांवर परिणाम होणार आहे. त्यापैकी ४४ झाडे आतापर्यंत तोडण्यात आली असून, आठ झाडे वाचविण्यात आली आहेत. उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी ३७ झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील १८ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. उद्यानाचा सध्याचा बाधित भाग पूर्ववत केल्यानंतरच उर्वरित हिरवळीतील कामाला सुरुवात केली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या उद्यानाच्या जागेवर किनारी रस्ता प्रकल्पातील पुलासाठी पिअर उभारण्याचे नियोजन असून, त्याच्या पायाभरणीचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. वर्सोवा ते दहिसर असा मुंबई किनारी रस्ता उत्तर प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याचा पहिला टप्पा २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सतर्क राहा!

उद्यानातील झाडांची कत्तल आणि अद्याप न हलवण्यात आलेल्या झाडांच्या मुद्द्यावरून स्थानिक रहिवासी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. शनिवारी सकाळी उद्यानाच्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील संदेश विविध स्थानिक व्हॉट्सॲप समूहांवर प्रसारित करण्यात आले असून, पर्यावरणाची काळजी असलेल्या नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १९ नोव्हेंबरला झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नताशा परेरा यांनी झाडांची कत्तल कधीही सुरू होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा, असे आवाहन केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा