प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडचा प्रस्ताव; ठाकरे गटासमोर भाजप नरमले; स्थायी समितीत कुजबूज

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत पादचारी मार्गावर छप्पर टाकण्याचा १९ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची सूचना केली.

Swapnil S

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत पादचारी मार्गावर छप्पर टाकण्याचा १९ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची सूचना केली. मात्र त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी फणसे यांना आपल्या खुर्चीजवळ बोलावले आणि काही मिनिटे चर्चा केली, त्यानंतर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सभागृह नेते यांच्याबरोबर चर्चा केली आणि अखेर प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोस्टल रोडवर बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाच्या बाहेर पडणाऱ्या जिन्यावर छप्पर उभारण्यासाठी १९ कोटी १ लाख रुपयाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी दोन आठवड्यापूर्वी सादर करण्यात आला होता. परंतु या कामाच्या जादा खर्चाबाबत आक्षेप घेत समितीने तो फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला. तब्बल दोनवेळा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने कोणते स्पष्टीकरण केले नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य यशोधर फणसे यांनी प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची सूचना मांडली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, सभागृह नेते गणेश खणकर यांच्यात कुजबुज झाली.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO