Mumbai : कोस्टल रोडवर बाईक चालवली; तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल 
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडवर बाईक चालवली; तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई कोस्टल रोडवर दुचाकी वाहनांना सक्त मनाई असतानाही तिथे दुचाकी चालवून स्वतःचा आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तीन तरुणांवर गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिनिधी

पूनम अपराज

मुंबई : मुंबई कोस्टल रोडवर दुचाकी वाहनांना सक्त मनाई असतानाही तिथे दुचाकी चालवून स्वतःचा आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तीन तरुणांवर गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नोव्हेंबरच्या पहिली दिवशी मध्यरात्री १२.५६ वाजण्याच्या सुमाराला महालक्ष्मी मंदिरामागे कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावरील महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल (एमएसएफ) चौकीजवळ ही घटना घडली. गावदेवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५६ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव नारायण टाकळे हे पोलीस नाईक पोफळे यांच्यासह 'गावदेवी मोबाईल ०५' युनिटवर रात्रीची गस्त घालत होते. यादरम्यान त्यांना मोबाईल युनिटच्या चालकाकडून तीन तरुणांची चौकशी केली जात असल्याचे निदर्शनासा आले.

चुकीच्या दिशेने दुचाकी

हे तरुण दुचाकी रस्त्याच्या चुकीच्या दिशेने चालवत असल्याचे आढळले. पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तर आणि दक्षिण वाहिन्यांमधील दुभाजकाजवळ त्यांची स्कूटर अडवली आणि चौकशीसाठी त्यांना बाजूला घेतले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यात महम्मद आरिफअली अहमद (१९, मेकॅनिक), निसार अहमद जमासुद्दीन (२१, सुतार) आणि ऋतिक अनिल धारिया (२२, सुतार) यांचा समावेश आहे. हे तिघेही वडाळा येथील रहिवासी आहेत.

मरीन ड्राईव्हला फेरफटका मारण्यासाठी निघाले होते

वाहन चालवणारा तरुण (अहमद) विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता, तर इतर दोघेजण मागे बसले होते. आपण मरीन ड्राईव्हवर फिरण्यासाठी चाललो होतो, असे या तरुणांनी सांगितले. कोस्टल रोडवर दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी असतानाही आरोपींनी जाणीवपूर्वक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि स्वतःसह इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण केला. रात्रीच्या ड्युटीवरील अधिकाऱ्याला माहिती घेऊन तिघांवर गुन्हा दाखल केला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग