Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक X
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक

कोस्टल रोडवरील बोगद्यात मंगळवारी एक भीषण अपघात घडला. नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यामध्ये एका भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली.

Krantee V. Kale

मुंबई : कोस्टल रोडवरील बोगद्यात मंगळवारी एक भीषण अपघात घडला. नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यामध्ये एका भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला. गर्दीच्या वेळीच हा अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. 

​अपघाताची माहिती मिळताच मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि पालिकेच्या आपत्कालीन बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्याचे काम सुरू केले. मात्र, सायंकाळच्या वेळी रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण असल्याने बऱ्याच वेळेपर्यंत वाहन धीम्या गतीने जात होत्या त्यामुळे वाहनधारकांना तासन्‌तास कोंडीत अडकून राहावे लागले. 

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

Maratha Reservation : चर्चेची दारे बंद- राधाकृष्ण विखे-पाटील यांचे संकेत

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई