मुंबई

Mumbai : दाम्पत्याने बनवला एसी लोकलचा बनावट पास; मध्य रेल्वेकडून पती-पत्नीवर गुन्हा दाखल

वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी बनावट मासिक पास बनविणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. एआयद्वारे ‘यूटीएस ॲप’मध्ये बनावट मासिक तिकीट बनविल्याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी बनावट मासिक पास बनविणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. एआयद्वारे ‘यूटीएस ॲप’मध्ये बनावट मासिक तिकीट बनविल्याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून यातून बनावट तिकीट रॅकेट उघडकीस येऊ शकते.

वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेनुसार वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे तपासणी करण्यात येत आहे. बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी मुंबई विभागाचे प्रवासी तिकीट निरीक्षक विशाल नवले सकाळी १०.०२ च्या कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणी करत होते. यादरम्यान एका महिला प्रवाशाकडे त्यांनी तिकीट तपासणीसाठी मागितले. महिला प्रवाशाने वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ ते दादर मार्गावर प्रवासासाठी ११ डिसेंबरपर्यंत वैध असलेले ‘यूटीएस ॲप’द्वारे निर्मित सीझन तिकीट दाखवले. तिकीट संशयास्पद वाटल्याने नवले यांना तिकिटाची पुष्टी केली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रवासी गुडिया शर्मा यांना आवश्यक कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस कल्याण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार करून पत्नीला वापरण्यासाठी दिल्याचे समोर आले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (बीएनएस) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट तिकीट तयार केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय अपराध असून यामध्ये दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा ‘एटीव्हीएम’द्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...