Mumbai : ऑनलाइन घोटाळ्यात न्यायमूर्तींची फसवणूक करणाऱ्यास अटक 
मुंबई

Mumbai : ऑनलाइन घोटाळ्यात न्यायमूर्तींची फसवणूक करणाऱ्यास अटक

क्रेडिट कार्डशी संबंधित ऑनलाइन घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या फसवणूकप्रकरणी मजहर आलम इस्रायल मियां याला पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

पूनम अपराज/मुंबई

क्रेडिट कार्डशी संबंधित ऑनलाइन घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या फसवणूकप्रकरणी मजहर आलम इस्रायल मियां याला पोलिसांनी अटक केली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी न्यायमूर्तींनी कफ परेड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. सायबर सेलने आरोपीचा छडा लावण्यासाठी झारखंडमधील जामतारा आणि देवघर येथे सलग १० दिवस अथक परिश्रम घेतले. पोलिसांनी जामतारा येथून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. तो झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील करमाटांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुकबंदी गावचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रेडिट कार्ड विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून पीडितांना व्हॉट्सॲपवर ‘credit card.apk’ सारख्या घातक ‘एपीके’ फाइल्स पाठवून लक्ष्य करत असे. या फाइल्स एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला पीडितांच्या मोबाईल फोनमध्ये अनधिकृत प्रवेश मिळायचा आणि तो क्रेडिट कार्डची संवेदनशील माहिती चोरत असे. या चोरलेल्या डेटाचा वापर करून शॉपिंग प्लॅटफॉर्मसह इतर पेमेंट गेटवे आणि मर्चंट प्लॅटफॉर्मद्वारे पैसे उकळले जात असत. तक्रारदाराने गुगलवर एचडीएफसी क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर शोधला होता आणि एका फसव्या नंबरवर संपर्क साधला होता. समोरच्या व्यक्तीने बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचा खोटा दावा केला. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपवर एक ‘एपीके’ फाइल इन्स्टॉल करण्यास भाग पाडले, ज्यामुळे फोनमध्ये प्रवेश मिळवला आणि क्रेडिट कार्ड खात्यातून ६ लाख रुपये फसवणुकीने वर्ग केले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स