MPSC पेपर फुटीप्रकरणी अनेक जणांना समन्स; गुन्हे शाखेकडून वेग 
मुंबई

MPSC पेपर फुटीप्रकरणी अनेक जणांना समन्स; गुन्हे शाखेकडून वेग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘औषध निरीक्षक’ परीक्षेच्या कथित पेपर फुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला असून चौकशीसाठी अनेक जणांना समन्स बजावले आहे.

Swapnil S

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘औषध निरीक्षक’ परीक्षेच्या कथित पेपर फुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला असून चौकशीसाठी अनेक जणांना समन्स बजावले आहे. गुन्हे शाखेची पथके सध्या या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या मुख्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यासाठी नंदुरबारमध्ये दाखल झाली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव उर्फ लोकेश पाटील याने सुरुवातीला परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला होता आणि नंतर आपली तक्रार मागे घेतली होती. त्याला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र, तो सध्या गायब असून तपास अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता लागलेला नाही.

तपासादरम्यान कोचिंग क्लासचालक प्रवीण पाटील आणि परीक्षा उत्तीर्ण झालेली एक महिला उमेदवाराचाही पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेने या तिन्ही व्यक्तींना समन्स बजावले होते, परंतु त्यांपैकी कोणीही आपापल्या घरी आढळून आले नाही.

सत्यता पडताळणी

कथित पेपर फुटीचे हे प्रकरण २२ मार्च रोजी झालेल्या ‘एमपीएसस’च्या ‘औषध निरीक्षक’ परीक्षेशी संबंधित आहे. या परीक्षेच्या दोन दिवस आधी उत्तर पर्यायांसह ९० प्रश्न फुटल्याचा आरोप झाला होता. या दाव्यांमधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आपला तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२