मुंबई

मुंबईतील धार्मिक स्थळे ‘लाऊडस्पीकरमुक्त‘; पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती

शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरून दिशा-नियंत्रित लाऊडस्पीकर्स हटवण्यात आले असून आता मुंबई ही 'लाऊडस्पीकरमुक्त' झाली आहे, असे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबई : शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरून दिशा-नियंत्रित लाऊडस्पीकर्स हटवण्यात आले असून आता मुंबई ही 'लाऊडस्पीकरमुक्त' झाली आहे, असे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याचे आरोप फेटाळून लावत, पोलीस आयुक्तांनी सांगितले की, ही कारवाई कोणत्याही एका समुदायाविरुद्ध नव्हती. या कारवाईपूर्वी आम्ही समाजिक व धार्मिक नेते तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची सहमती मिळवली. यावरून ही कारवाई सहकार्याच्या आधारे राबवण्यात आली हे स्पष्ट होते, असे भारती म्हणाले. ही कारवाई जानेवारी २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.

१,५०० लाऊडस्पीकर्स आम्ही हटवले

शहरभरातील सुमारे १,५०० लाऊडस्पीकर्स आम्ही हटवले आहेत. यापुढे अशा लाऊडस्पीकर्सची पुन्हा उभारणी होणार नाही, याचीही पोलीस खात्याने दक्षता घेतली आहे. कायमस्वरूपी लाऊडस्पीकर्सवर बंदी लागू झाली असली, तरी धार्मिक सण-उत्सवांच्या वेळी परवानग्या दिल्या जातील, असेही भारती यांनी स्पष्ट केले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता