Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन  (Photo-X)
मुंबई

Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (एईएल) संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते सोमवारी माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर भूमिपूजन पार पडले.

Swapnil S

मुंबई : अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (एईएल) संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते सोमवारी माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर भूमिपूजन पार पडले. या निमित्ताने १० लाखांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या धारावीतील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली. अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) मूळ जागी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देईल.

माटुंगा येथे आम्ही १० इमारतींमध्ये १०,४३२ घरे आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळे उभारत आहोत. कुटुंबांना अधिक चांगले जीवन व्यतीत करता येईल आणि आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य घडवता येईल, अशा वसाहती आम्ही निर्माण करत आहोत,’ असे प्रणव अदानी म्हणाले.

या १० इमारती तीन टप्प्यांत धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (डीआरपी/एसआरए) हस्तांतरित केल्या जातील. पहिल्या पाच इमारती मार्च २०२९ पर्यंत, त्यानंतरच्या दोन इमारती ऑगस्ट २०२९ पर्यंत, तर उर्वरित तीन इमारती ऑगस्ट २०३० पर्यंत हस्तांतरित होतील.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. डीआरपी/एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. महेंद्र कल्याणकर हेदेखील समारंभाला उपस्थित होते.

धारावीकरांसाठी महत्वाचा टप्पा

डॉ. कल्याणकर म्हणाले, ‘धारावीतील कुटुंबांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयीसुविधांसह सुरक्षित, आधुनिक घरे देण्यावर आमचा भर आहे. प्रत्येक इमारत ३७ ते ३९ मजल्यांची असेल. प्रत्येक इमारतीत १० ते १२ प्रवासी लिफ्ट्स आणि दोन स्वतंत्र फायर लिफ्ट्स असतील. व्यावसायिक व औद्योगिक गाळ्यांसाठी आणखी दोन लिफ्ट्स असतील. किंडरगार्टन, कम्युनिटी हॉल, पोडियम उद्याने, आसनव्यवस्था, सोसायटी ऑफिसेस आणि प्रार्थनास्थळे या सुविधांचा त्यात समावेश असेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गरबा, दांडिया सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष; मंडळांपासून मैदानांपर्यंत वाढता पहारा, महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा

Palghar : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड

Raigad : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय; पतीला अटक, चौघांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai : २५० कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी! पैसे भरूनही वर्षभरापासून घरांचा ताबा मिळत नसल्याने खरेदीदार त्रस्त