Mumbai : दिवाळीसाठी ड्रायफ्रूट खरेदी जोरात; महागाईतही होलसेल बाजारात काजू-बदामांना वाढती मागणी 
मुंबई

Mumbai : दिवाळीसाठी ड्रायफ्रूट खरेदी जोरात; महागाईतही होलसेल बाजारात काजू-बदामांना वाढती मागणी

दिवाळीचा सण जवळ येताच मुंबईतील बाजारपेठा रोषणाई, मिठाई आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या उत्साहाने गजबजल्या व सजल्या आहेत. मिठाई, फराळ आणि आकर्षक भेटवस्तूंसोबतच ड्रायफ्रूटच्या खरेदीलाही आता वेग आला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असले, तरी वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड व खजूर खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : दिवाळीचा सण जवळ येताच मुंबईतील बाजारपेठा रोषणाई, मिठाई आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या उत्साहाने गजबजल्या व सजल्या आहेत. मिठाई, फराळ आणि आकर्षक भेटवस्तूंसोबतच ड्रायफ्रूटच्या खरेदीलाही आता वेग आला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असले, तरी वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड व खजूर खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. विशेषतः मस्जिद बंदर परिसरातील ड्रायफ्रूटच्या होलसेल बाजारात ग्राहकांची लगबग सुरू झालेली दिसत आहे. मुंबई ते विरार पर्यंतच्या ग्राहकांनी जर फोनवर ऑर्डर दिली तर फ्री होम डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध असल्याचे ओम ड्रायफ्रूटचे मालक सुरेश शहा यांनी सांगितले.

सण कुठलाही असो मुंबईत प्रत्येक सणाची मजा काही औरच असते. नवरात्रोत्सव संपताच दिवाळी सणाचे वेध लागले आहेत. मुंबईत दिवाळी सणानिमित्त संपूर्ण मुंबई रोषणाईने उजळून निघते. यंदाही दिवाळी निमित्त खरेदीसाठी बाजारात आता गर्दी उसळू लागली आहे. मस्जिद बंदर हे ड्रायफ्रूटच्या घाऊक व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथील दुकानांमध्ये विविध प्रकारचे ड्रायफ्रूट आकर्षक पॅकिंगमध्ये मांडण्यात आले आहेत. घरगुती वापरापासून ते दिवाळीच्या भेटवस्तूंपर्यंत विविध गरजांसाठी ग्राहक येथे खरेदी करतात. घाऊक बाजारातून खरेदी करण्याची संधी, विविध प्रकाराची उपलब्धता आणि गरजेनुसार पॅकिंग यामुळे या बाजाराकडे ग्राहकांचा ओढा वाढतो.

गोडवा वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खरेदी

मस्जिद बंदर येथील हॉटेल प्रभूच्या समोरच्या बाजूला ॐ ड्राय फ्रूटचे दुकान आहे. येथे होलसेलच्या दरात ड्राय फ्रूट उपलब्ध होत असल्याने दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. परंतु दिवाळी, ख्रिसमस या सणासुदीच्या काळात ग्राहकांची गर्दी उसळते. आज घरातील चार व्यक्ती पैकी तीन जण कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे दिवाळी सणाच्या खरेदीसाठी वेळ मिळत नसलेल्यांसाठी फ्री होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. महागाईमुळे खरेदीचे प्रमाण किंवा पॅकिंगचा आकार कमी करण्याचा पर्याय काही ग्राहक निवडतात. तरीही दिवाळीच्या फराळात आणि भेटवस्तूंमध्ये ड्रायफ्रूटचे महत्त्व कायम आहे. वाढत्या दरांमध्येही सणाचा गोडवा टिकवण्यासाठी मुंबईकरांची ड्रायफ्रूट खरेदीला पसंती कायम आहे.

ड्रायफ्रूटचा बाजारातील आकारमानानुसार दर ( प्रति किलो)

  • काजू - ८८० रुपये, ९६० रुपये, १,००० रुपये, १,१००

  • बदाम - ८०० रुपये, १,००० रुपये, १,०४० रुपये १,१२०

  • पिस्ता - ३,००० रुपये, ३,२०० रुपये, ३,४०० रुपये, ३,६००

  • अक्रोड - १,००० रुपये, १,४०० रुपये, १,६०० रुपये, १,८०० रुपये, २,००० रुपये, २,४०० रुपये

  • इतर सुकामेवा व सुकी फळे : ३६० रुपये, ४०० रुपये, ४४० रुपये, ४८० रुपये, ६०० रुपये, ७२० रुपये

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वृक्षतोडीविरुद्ध जनक्षोभ; स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष, कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापले

लोकल'कल्लोळ'! मध्य रेल्वेचा बोजवारा, चाकरमान्यांचे प्रचंड हाल; तिघांचा मृत्यू, सकाळचा खोळंबा संध्याकाळपर्यंत कायम; ६० हून अधिक फेऱ्या रद्द

'अर्णव'मुळे पावसासाठी अनुकूल वातावरण; कोकण किनारपट्टीवर हलक्या सरींचा अंदाज

'ऑडिओ क्लिप' प्रकरणी चौकशीसाठी SIT; आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे तपास पथकाचे प्रमुख

लष्करासाठी २.१२ लाख कोटींची शस्त्र खरेदी; केंद्र सरकारची मंजुरी, लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार