मुंबईत दर तासाला १७ जणांना कुत्र्यांचा चावा; २०२१ च्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत दर तासाला १७ जणांना कुत्र्यांचा चावा; २०२१ च्या तुलनेत जवळपास दुप्पट

शहरात २०२५ मध्ये दर तासाला जवळपास १७ जणांना कुत्र्यांनी चावल्याचे उघड झाले आहेत. २०२१ मधील दराच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : शहरात २०२५ मध्ये दर तासाला जवळपास १७ जणांना कुत्र्यांनी चावल्याचे उघड झाले आहेत. २०२१ मधील दराच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळविलेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत कुत्रा चावल्याच्या १,५४,०१७ घटनांची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक वार्षिक आकडा आहे.

आरटीआयच्या उत्तरानुसार, २०२१ मध्ये मुंबईत कुत्रा चावल्याच्या ७९,२५२ घटनांची नोंद झाली होती. म्हणजेच दररोज सरासरी २१७, तर दर तासाला सुमारे नऊ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. २०२२ मध्ये ही संख्या वाढून १,०६,७९७ झाली. त्यानंतर २०२३ मध्ये ती घटून ६१,३३२ वर आली. मात्र, २०२४ मध्ये घटनांची संख्या पुन्हा वाढून १,२८,२५२ झाली, तर २०२५ मध्ये ती आणखी वाढून १,५४,०१७ वर पोहोचली. यानुसार, २०२५ मध्ये दररोज सरासरी ४२१ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली.

पाच वर्षांत मुंबईत कुत्रा चावल्याच्या एकूण ५,२९,६५० घटनांची नोंद झाली. म्हणजेच दररोज सरासरी २९० घटना घडल्या. २०२३ मध्ये घटनांमध्ये घट झाल्यानंतर २०२४ आणि २०२५ मध्ये झालेली तीव्र वाढ चिंताजनक आहे.

आरटीआयच्या उत्तरात मुंबईत कुत्रा चावल्यामुळे किंवा कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्यामुळे कोणत्याही मृत्यूची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, कुत्रा चावण्याच्या घटनांची मोठी संख्या पाहता निर्बीजीकरण आणि लसीकरणाच्या उपाययोजना या समस्येच्या वाढत्या प्रमाणाशी सुसंगत आहेत का, याचा आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

रेबीज लसींचा तुटवडा

कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ आणि रेबीज प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याबाबत समोर येणाऱ्या वृत्तांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “मुंबईत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याच्या बातम्याही वारंवार समोर येत आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बीएमसीने सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी