मुंबई

मुंबईत १ लाखाहून अधिक श्वानांचे लसीकरण; २०२३ पासून १६३ आरोग्य संस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संकल्प आहे की मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त होईल. यासाठी २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण केले गेले असून, पालिका क्षेत्रातील १६३ आरोग्यसंस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे सेवेत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संकल्प आहे. याकरिता २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पालिका क्षेत्रात लसीकरण सुविधेसाठी १६३ आरोग्यसंस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे सेवेत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रेबीजसंबंधी लसीकरण आणि उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड रेबीज डे' साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबीजविषयी जनजागृती करणे आणि रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करणे असे आहे. रेबीज दिनाच्या औचित्याने जागतिक स्तरावर आयोजन केले जाते.

श्वान चावल्यावर घ्यावयाची काळजी

  • जखम साबण व स्वच्छ पाण्याने १५ मिनिटे धुणे

  • हळद, तेल, चुना इत्यादी काहीही लावू नये

  • वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी-रेबीज लसीकरण पूर्ण करा

  • आपल्या पाळीव प्राण्यांना नियमितपणे लस द्या

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती