Mumbai : 'बेस्ट कॅन्टीन', 'इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस'चे परवाने निलंबित 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : 'बेस्ट कॅन्टीन', 'इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस'चे परवाने निलंबित

अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील दोन खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील दोन खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये ग्राहकांना परत आलेला शिळा पाव ताज्या पावात मिसळणे आणि मिठाईमध्ये अनधिकृत खाद्य रंगांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे.

कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये बोरिवली पश्चिम येथील 'मेसर्स बेस्ट कॅन्टीन' आणि भांडुप पश्चिम येथील 'मेसर्स इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' यांचा समावेश आहे. बोरिवली पश्चिम येथील एलआयसी कॉलनीतील शांती आश्रम बस डेपोमधून चालवले जाणारे 'बेस्ट कॅन्टीन' हे एक लोकप्रिय आणि खिशाला परवडणारे स्थानिक खाद्य उपाहारगृह आहे. तपासणीदरम्यान या ठिकाणी 'अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसाय परवाना आणि नोंदणी) नियम, २०११' च्या अनुसूची-४ मधील नियमांचे अनेक गंभीर उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.

सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ

तपासणीत कॅन्टीनमधील स्वयंपाकघर व सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असल्याचे दिसून आले. तसेच गंजलेले रॅक आणि भांडी, ग्राहकांकडून परत आलेला पाव ताज्या पावासोबत मिसळणे, तपमानाची (तापमान) अपूर्ण नोंद आणि कामगारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे नसणे यांसारख्या बाबी उघडकीला आल्या. याशिवाय मिठाई तयार करताना त्यात अनधिकृत खाद्य रंगांचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनाला आले. दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा अन्नसुरक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबद्दल नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन एफडीएतर्फे (एफडीए) करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी