Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने कडक पावले उचलली आहेत.

Swapnil S

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने कडक पावले उचलली आहेत.

यासाठी दोन्ही यंत्रणांकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून फटाके फोडण्याच्या आवाजाबाबत तक्रार प्राप्त होताच संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

फटाक्यांचा मोठा आवाज होत असल्यास नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रार प्राप्त होताच संबंधित विभागातील अधिकारी आणि पोलीस यंत्रणेला त्याची माहिती देऊन आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

..तर अनामत रक्कम जप्त

दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी किंवा अन्यत्र कार्यक्रम, इव्हेंट आयोजित करणा-यांना महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना कार्यक्रम आयोजित करणे किंवा परवानगीतील अटींचे उल्लंघन करणे संबंधित आयोजकांना महागात पडू शकते. नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांनी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाईही केली जाणार आहे.

आवश्यक परवानग्या घ्याव्यात

ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सार्वजनिक शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना नियम पाळावेत तसेच कार्यक्रम आयोजकांनी आवश्यक परवानग्या घेऊनच आयोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला

'इस्रो'ने लाँच केले जीएसएलव्ही-एफ१८; उपग्रह 'एनव्हीएस-०३' अवकाशात स्थापित

Mumbai : दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी; सांताक्रूझमध्ये १०.२ मिमी पावसाची नोंद