संग्रहित फोटो
मुंबई

मुंबई विकायला काढली! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘महायुती’ सरकारवर टीका

मात्र जोपर्यंत मराठी माणूस आणि शिवसेना आहे तोपर्यंत भ्रष्ट महायुतीला मुंबई विकायला देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकण्यासाठी महायुती षडयंत्र रचत आहे. धारावी, देवनार, कुर्ला, मुलुंड येथील जमिनी विक्रीसाठी काढल्या आहेत. फक्त एका कंत्राटदाराला खूश करण्यासाठी महायुतीचा खटाटोप सुरू आहे. राज्यातील महायुती सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मात्र जोपर्यंत मराठी माणूस आणि शिवसेना आहे तोपर्यंत भ्रष्ट महायुतीला मुंबई विकायला देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. चेंबूरच्या आरसीएफमध्ये शिवसेना कर्मचाऱ्यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

वांद्रे (पूर्व) येथे शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. ही वसाहत ५० ते ६० वर्षांपासून आहे. या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा, अशी मागणी केली जात होती. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. तसेच वसाहतीचा पुनर्विकास करताना वसाहतीतील रहिवाशांचे पुनर्वसन आहे. त्या ठिकाणी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र गद्दारांनी सरकार पाडले आणि प्रश्न प्रलंबित राहणार असे वाटत होते. मात्र राज्यात पाडापाडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केलेल्या महायुतीचा डोळा वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीवर पडला.

या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन अशक्य आहे. त्यामुळे त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता यावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.

कोविड सेंटरचा भूखंड दिल्लीच्या घशात !

वांद्रे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरे मिळालीच पाहिजेत किंवा मग एका बिल्डरला दिलेल्या वांद्रे रिक्लेमेशनवरील भूखंडाच्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना जागा द्या. आपले सरकार घालवल्यावर त्यांनी वांद्रे-कुर्ल्यातील कोविड सेंटर ज्या जागेवर उभे केले तो भूखंड दिल्लीच्या मालकाला दिला. बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील भूखंड देऊन टाकला. बुलेट ट्रेनचा आपल्याला किती उपयोग, मुंबईकर तिथे रोज फाफडा, शेव किंवा ढोकळा खाणार आहे का? ज्याची गरज नाही ते आमच्या माथी मारले जातेय. आमच्या हक्काची मराठी माणसं त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार. मात्र हे मी होऊ देणार नाही, असा कडक इशारा ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल