पास विद्यार्थांपेक्षा जागा अधिक; अकरावीसाठी मुंबईत ४ लाख ७६ हजार जागा, ठाण्यात १ लाख ६० हजार जागा उपलब्ध 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

पास विद्यार्थांपेक्षा जागा अधिक; अकरावीसाठी मुंबईत ४ लाख ७६ हजार जागा, ठाण्यात १ लाख ६० हजार जागा उपलब्ध

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा ४ लाख ७६ हजार जागा २५० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १ लाख ६० हजार ८४० जागांचा समावेश आहे. यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विद्यार्थी दहावी परीक्षेत पास झाले असल्याने यंदाही अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : शिक्षण संचालनालयाने दहावी निकालानंतर राज्यातील अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा ४ लाख ७६ हजार जागा २५० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १ लाख ६० हजार ८४० जागांचा समावेश आहे. यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विद्यार्थी दहावी परीक्षेत पास झाले असल्याने यंदाही अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

दहावी परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी पास झाले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी चांगले महाविद्यालय मिळावे, यासाठी विद्यार्थांमध्ये चुरस लागणार आहे. जागा जास्त शिल्लक राहत असल्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार आहे. मात्र, आवडीचे महाविद्यालय मिळावे, यासाठी पास झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत.

अशा आहेत जागा

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा ४ लाख ७६ हजार जागा २५० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा मुंबई शहर आणि उपनगरात उपलब्ध आहेत. या दोन जिल्ह्यात १ लाख ९९ हजार ७० जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात १ लाख ६० हजार ८४० जागांचा समावेश आहे तर पालघर जिल्ह्यात ६६ हजार ६२० आणि रायगड जिल्ह्यात ४९ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत.

  • मुंबई शहरातून २४ हजार ४५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर पश्चिम उपनगरातून ४८ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व उपनगरातून ३९ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  • ठाणे जिल्ह्यातून १ लाख १० हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.०४ टक्के लागला आहे.

  • रायगड जिल्ह्यातून ३५ हजार २१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ टक्के आहे.

  • पालघर जिल्ह्यातून ६० हजार ५५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५६ हजर २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्के लागला आहे.

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान