मुंबई

मुंबईकरांसाठी चांगली बातमी; गोखले लोहमार्ग उड्डाणपूल वाहतुकीस खुला; विक्रमी वेळेत पूर्णत्वास!

अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना ठरला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी उदघाटनाप्रसंगी काढले.

Swapnil S

मुंबई : गोखले पुलाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. गोखले पूल हा बीएमसीचा सर्वात जलद पूर्ण झालेला प्रकल्प असून पूल बंद झाल्यापासून २८ महिन्यांच्या आत तो खुला झाला आहे.

गोखले पुलाचे महानगरपालिकेच्या हद्दीतील काम २५ मार्च २०२१ आणि रेल्वे हद्दीतील काम १ एप्रिल २०२३ रोजी सुरू झाले. या प्रकल्पाचा पहिल्या टप्पा (पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी) २६ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. तर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाची उत्तर बाजू ५ जुलै २०२४ रोजी कार्यान्वित झाली. पूल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.

हा पूल पूर्ण क्षमतेने खुला झाल्याने अंधेरी-पूर्व येथील तेली गल्ली उड्डाणपुलासह गोपाळकृष्ण गोखले पुलामुळे, अंधेरी पूर्व बाजूस असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गापासून अंधेरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गापर्यंत जोडणी होणार आहे. तर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाद्वारे, स्वामी विवेकानंद मार्ग चौकातील वाहतूक टाळून, पश्चिम दिशेकडील जे.व्ही.पी.डी., जुहू, वेसावेपर्यंत थेट वाहतूकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल नव्याने बांधून विक्रमी वेळेत पूर्णत्वास आला आहे.

हा प्रकल्प अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना - शेलार

अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना ठरला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी उदघाटनाप्रसंगी काढले. या पुलाच्या जोडणीमुळे मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार असल्याचा विश्वासदेखील शेलार यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, आमदार मुरजी पटेल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह विविध मान्यवर, स्थानिक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प