Mumbai : गोरेगावमध्ये अग्निभडका; तीन लहान मुलांसह २१ जणांना वाचवले, कुत्र्याचीही सुखरूप सुटका  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : गोरेगावमध्ये अग्निभडका; तीन लहान मुलांसह २१ जणांना वाचवले, कुत्र्याचीही सुखरूप सुटका

गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड युनिट नंबर ३० येथील रॉयल पाम्स इस्टेटमधील तळ अधिक २५ मजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरील खोली क्रमांक ८०३ मध्ये बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अग्निभडका उडाला.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड युनिट नंबर ३० येथील रॉयल पाम्स इस्टेटमधील तळ अधिक २५ मजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरील खोली क्रमांक ८०३ मध्ये बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अग्निभडका उडाला. तीन मुलांसह १० पुरुष आणि ८ महिला अशा एकूण २१ जणांना या आगीतून वाचवण्यातआले. दरम्यान, अडकलेल्या कुत्र्याचीही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

गोरेगाव (पूर्व) आरे रोडवर युनिट नंबर ३० येथे राॅयल पाम्स इस्टेट असून याठिकाणी अमब्रेल २५ मजली आहे. या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ८०३ आणि ८०४ या खोल्यांमध्ये आग लागल्यानंतर काही वेळातच ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीच्या वरील मजल्यापर्यंत त्याची झळ बसली. आगीमुळे धुराचे लोट पसरले. रहिवाशांनी इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु धुरांच्या लोटामुळे रहिवासी वरील मजल्यावर अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. यात १५व्या मजल्यावरून २१ जणांची सुटका करण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

या घटनेत घरातील विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, लाकडी फर्निचर, स्क्रॅप साहित्य, पीव्हीसी पाईप, इन्सुलेटिंग मटेरियल तसेच कार्यालयीन कागदपत्रे जळून खाक झाली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलीस करत आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स