Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल १३०० झाडे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या झाडांवर मुंबई महापालिकेच्या वतीने नोटिसा चिकटविण्यात आल्याने वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल १३०० झाडे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या झाडांवर मुंबई महापालिकेच्या वतीने नोटिसा चिकटविण्यात आल्याने वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गोरेगाव आणि मुलुंड या दोन उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे बाधित होणार असल्याने पर्यावरणीय परिणामांचाही विचार होणे आवश्यक आहे. संबंधित झाडांवर नोटिसा लावून महापालिकेने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

पर्यावरणप्रेमींनी घेतला आक्षेप

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव – ऐरोली टोलनाका, मुलुंड या प्रस्तावित जीएमएलआरच्या टप्पा-४ अंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआर जंक्शनच्या सुधारणा कामासाठी १,३५२ झाडे तोडण्याचा, तर १३०० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असून विकासाच्या नावाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली जात होती. वृक्षतोड आणि पुनर्रोपणासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी

वगळलेल्या मतदारांच्या अपिलांना प्राधान्य द्या! सुप्रीम कोर्टाचे निर्देश