Mumbai : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क - मुख्यमंत्री X| Dev_Fadnavis
मुंबई

Mumbai : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क - मुख्यमंत्री

मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्याने भोगवटादार वर्ग-१ दर्जा देऊन मालकी हक्क देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्याने भोगवटादार वर्ग-१ दर्जा देऊन मालकी हक्क देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. या निर्णयामुळे संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास सुलभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ रूपांतरण आदेश वितरित करण्यात आले. सुमारे ६२ एकरांवरील या वसाहतीत ११३ सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील ६ हजार २५० सदनिका आणि २५ हजार रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे या सदस्यांना मालकी हक्क मिळून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने २०१७-१८ मध्ये कायद्यात बदल करून भाडेपट्ट्यावरील जमिनी वर्ग-१ करण्याची व्यवस्था निर्माण केली. सुरुवातीला २५ टक्के आणि त्यानंतर १० टक्के अधिमूल्य आकारण्यात येत होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेऊन पाच टक्के अधिमूल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमताने मान्य केला. अधिमूल्य कमी केल्यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना लाभ होईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्य सरकारने स्वयं-पुनर्विकासासाठी विविध सवलती दिल्यामुळे मुंबईत सुमारे १ हजार ६०० प्रस्ताव पुढे आले असून शासनाने त्यासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईतील शासकीय जमिनीवरील अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही वर्ग-१ रूपांतरणाचा लाभ देण्यासाठी महसूल विभागाने व्यापक मोहीम राबवावी. संस्थांच्या परिसरात शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक मदत करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

‘मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे. मुंबईतील सर्वसामान्यांना उत्तम जीवनमान मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी

सोनिया गांधी यांचे नागरिकत्व : पोलिसांचा कोर्टात अहवाल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी