क्यूआर कोड देऊनही फेरीवाल्यांवर कारवाई; पोलिसांना क्यूआर कोड डेटा देणार -विपीन शर्मा 
मुंबई

Mumbai : क्यूआर कोड देऊनही फेरीवाल्यांवर कारवाई; पोलिसांना क्यूआर कोड डेटा देणार -विपीन शर्मा

मुंबईतील ४७ हजारांहून अधिक पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात आले आहे. मात्र क्यूआर कोड दिल्यानंतरही संबंधित विभागातील पोलीस कारवाई करत असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी पालिका प्रशासनाकडे केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील ४७ हजारांहून अधिक पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात आले आहे. मात्र क्यूआर कोड दिल्यानंतरही संबंधित विभागातील पोलीस कारवाई करत असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी पालिका प्रशासनाकडे केली.

मुंबई महापालिकेने पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड दिले, त्याचा डेटा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.

मुंबईत ९९ हजार ३४५ फेरीवाले असून पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृत ओळख मिळावी तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

नगर पथविक्रेता (फेरीवाले) अधिनियम आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार, नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण करण्याचा प्रातिनिधिक शुभारंभ २५ जून रोजी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईत ९९ हजार ३४५ पात्र फेरीवाले असून त्यापैकी ४७,७२० फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात आले आहे, तर उर्वरित पात्र फेरीवाल्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत ४७ हजार ७२० फेरीवाल्यांना क्यूआर कोड देऊनही पोलीस कारवाई करत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. पात्र फेरीवाले किती, किती फेरीवाल्यांना क्यूआर कोड दिले, याची माहिती पोलिसांनी मागितली असून संपूर्ण डेटा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे विपीन शर्मा यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल