Mumbai : अतिगंभीर रुग्णांसाठी ३० टक्के बेड्स आरक्षित ठेवण्याची मागणी; पालिका रुग्णालये अशक्त, फक्त ७९७ ICU बेड्स 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : अतिगंभीर रुग्णांसाठी ३० टक्के बेड्स आरक्षित ठेवण्याची मागणी; पालिका रुग्णालये अशक्त, फक्त ७९७ ICU बेड्स

गंभीर आजारी रुग्णाला अतिदक्षता विभागात बेड्स उपलब्ध होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : गंभीर आजारी रुग्णाला अतिदक्षता विभागात बेड्स उपलब्ध होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयात सहा हजारांहून अधिक बेड्स आहेत. मात्र अतिदक्षता विभागात फक्त ७९७ बेड्स उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. अतिदक्षता विभागात बेड्सची कमतरता असल्याने रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. अतिदक्षता विभागात उपलब्ध बेड्सपैकी ३० बेड्स आरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. स्वस्त व दर्जेदार उपचार या विश्वासाने देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र रुग्णालयात बेड्स मिळत नसल्याने गाद्या टाकून रुग्णांना जमिनीवर झोपवावे लागते किंवा एका बेडवर दोन रुग्ण ठेवले जातात. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अतिदक्षता विभागात ३० टक्के बेड्स अतिशय गंभीर रुग्णांसाठी वा गरजूंसाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी ठरावाची सूचना नगरसेविका मेहेर हैदर यांनी मांडली असून येत्या ९ एप्रिल रोजी महापालिका सभागृहात चर्चा होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मोठया रुग्णालयात ६ हजार ४७३ खाटांपैकी अतिदक्षता विभागात ६८१, तर महापालिकेच्या लहान रुग्णालयात ३ हजार २५४ खाटापैकी अतिदक्षता विभागात केवळ ११६ खाटा आहेत. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या ही एकूण खाटांच्या तुलनेत अपुरी आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या, साथीचे रोग, अपघात, संसर्गजन्य रोग, माता आणि नवजात बालकांशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता आधुनिक नागरी आरोग्य व्यवस्थेमध्ये अतिदक्षता उपचारासाठी खाटाची संख्या जादा असणे गरजेचे आहे.

रुग्णालयांतील बेड्स‌ची उपलब्धता

  • रुग्णालय एकूण आयसीयू

  • केईएम रुग्णालय २,२५० ३२८

  • नायर रुग्णालय १,६२३ १४०

  • सायन रुग्णालय १,८५० १७३

  • कूपर रुग्णालय ७५० ४०

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी