Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश 
मुंबई

Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जेजे रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही सेवा उपलब्ध होईल. यासंदर्भात आवश्यक ती वैद्यकीय आणि प्रशासकीय तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : जेजे रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही सेवा उपलब्ध होईल. यासंदर्भात आवश्यक ती वैद्यकीय आणि प्रशासकीय तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करण्याबाबत मुश्रीफ यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ मनुष्यबळ, उपकरणे आणि इतर अनुषंगिक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. शस्त्रक्रियागृह, जेजे रुग्णालयात यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तसेच प्रशासकीय बाबी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण कराव्यात. आवश्यक सुविधा, उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले.

आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण जीवनरक्षक उपचारांपासून वंचित राहू नये, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे यकृत आणि किडनी प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञांचा पुढाकार

  • जे जे रुग्णालयात यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेवा सुरू करण्यासाठी नानावटी रुग्णालयातील संबंधित विभागाचे प्रमुख डॉ. गौरव चौबल यांचे सहकार्य.

  • डॉ. चौबल यांच्या रुग्णालयात दरमहा सुमारे ३० ते ४० यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. त्यांच्या अनुभवाचा आणि तज्ज्ञ सेवेचा लाभ जे जे रुग्णालयातील रुग्णांना मिळणार.

  • सैफी रुग्णालयातील यकृत आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. गौरंग शहा यांचीही जे जे रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी सहकार्याची तयारी.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी

सोनिया गांधी यांचे नागरिकत्व : पोलिसांचा कोर्टात अहवाल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी