जुहू येथे १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू  
मुंबई

Mumbai : जुहू येथे १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जुहू येथे महापालिकेच्या ताब्यातील एका भूखंडामध्ये असलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या दिनेश बसवराज हरिजन (१०) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

Swapnil S

मुंबई : जुहू येथे महापालिकेच्या ताब्यातील एका भूखंडामध्ये असलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या दिनेश बसवराज हरिजन (१०) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१३) दुपारी घडली.

सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जुहू, वायरलेस कंपाऊंड, डी. एन. नगर, जागृत हनुमान मंदिरामागे अंधेरी (पश्चिम) येथे एका खासगी जागेतील तलावात दिनेश बसवराज हरिजन (१०) हा मुलगा त्याच्या २-३ मित्रांसोबत पोहायला गेला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अथवा त्याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र तो न सापडल्याने अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी बोलावण्यात आले. त्यांनी तलावात कसून शोध घेतल्यानंतर बुडालेला दिनेश बसवराज हरिजन (१०) या मुलाचा शोध लागला. त्याला तातडीने नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पालिकेवर हलगर्जीपणाचा आरोप

हा भूखंड पालिकेच्या अखत्यारीतील असून त्या भूखंडावर संरक्षक कुंपण न बांधल्याने ही घटना घडल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी केला आहे. तसेच, मृत मुलाच्या कुटुंबियांना महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दहिसर पूर्व नॅशनल पार्क हद्दीतील केतकी पाडा येथे शनिवारी एका खाणीतील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पियुष गुप्ता (१९) आणि ओम अंकुश सिंग (१९) या दोन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी जुहू येथे ही घटना घडल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी