Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी येणे सुरूच; समितीची नियुक्ती करणार, हायकोर्टाचे संकेत  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी येणे सुरूच; समितीची नियुक्ती करणार, हायकोर्टाचे संकेत

कांजूरच्या डंपिंग ग्राऊंड व त्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूचा रात्री १ ते पहाटे ६ दरम्यान होणाऱ्या उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Swapnil S

मुंबई : कांजूरच्या डंपिंग ग्राऊंड व त्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूचा रात्री १ ते पहाटे ६ दरम्यान होणाऱ्या उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नियंत्रणात आलेली दुर्गंधी अचानक पुन्हा सुरू झाली असून ही दुर्गंधी कशी सुरू होते, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने रात्रीच्या वेळी किंवा पहाटे नेमके काय घडते? तेथे कत्तलखान्यातील कचरा किंवा इतर ठिकाणचा अतिरिक्त कचरा रात्री टाकला जातो का, असे प्रश्न उपस्थित करत या डंपिंग ग्राऊंडवर लक्ष ठेवण्यासाठी एका स्वतंत्र निरीक्षकाची किंवा समितीची नियुक्ती करणार असल्याचे संकेत देत या दुर्गंधीचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने पालिकेला दिले.

कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरणवादी कार्यकर्ते दयानंद स्टॅलियन यांच्या वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने ॲड. झमान अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे, तर विक्रोळी कन्नमवारनगर येथील रहिवाशांनी ॲड. अभिजित राणे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. डंपिंगमुळे दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असून यावर प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

काहीतरी चुकत आहे

पंधरा दिवसांपूर्वी न्यायमूर्तींनी स्वतः या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर दुर्गंधीचे प्रमाण कमी झाले. मात्र, दोन तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी दुर्गंधी पुन्हा सुरू झाली. त्या मागे नेमके कारण आणि उगमस्थान काय आहे, याबाबत खंडपीठाने पालिका तसेच कंत्राटदाराला विचारणा करताना काहीतरी चुकत आहे, जे तुम्हाला ओळखावे लागेल. तुम्ही समस्येच्या अगदी जवळ आहात आणि ही दुर्गंधी ओळखणे आवश्यक आहे. मिथेनसह इतर वायूंचे उत्सर्जन पुन्हा का सुरू झाले याची माहिती सादर करा तसेच रात्रीची देखरेख महिनाभर सुरू ठेवा, असे आदेश देत सुनावणी जूनपर्यंत तहकूब केली.

SRA कायद्याचे ऑडिट करा, तज्ज्ञ समिती नेमा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

व्यापार करार अधांतरी! भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा वेग मंदावण्याची शक्यता

मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के; सर्वाधिक ५९५ शाळा; ठाण्यात ४४२ शाळांची उल्लेखनीय कामगिरी