संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : तलाव परिसरात यंदा कमी पाऊस; पाणीसाठ्यात किंचितशी घट

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये पावसाने जुलै महिन्यापर्यंत दमदार हजेरी लावली. मात्र, यावर्षी झालेला पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने एकूण पाणीसाठ्यात किंचितशी घट झाली आहे. अशी आकडेवारी समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये पावसाने जुलै महिन्यापर्यंत दमदार हजेरी लावली. मात्र, यावर्षी झालेला पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने एकूण पाणीसाठ्यात किंचितशी घट झाली आहे. अशी आकडेवारी समोर आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मिडल वैतरणा आणि भातसा यांसारख्या मोठ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये आजमितीस ८९.२० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, गेल्यावर्षी याच दिवशी ९२.५५ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध होता, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

यावर्षी विहार आणि तुळशी या दोन तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. विहार तलावात यावर्षी २७२० मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी यावेळेत या तलावात २४०० मिमी पाऊस पडला होता. तर तुळशी तलावात यावर्षी ३३०९ मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षी ३३६३ मिमी पाऊस झाला होता.

दोन वर्षांतील पावसाची तुलनात्मक घट

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; HC ने व्यक्त केली चिंता

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत! दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करणार : बावनकुळे