Mumbai : लालबाग येथील मसाला गल्ली अतिक्रमणमुक्त; ‘एफ-साऊथ’ विभागाची कारवाई  
मुंबई

Mumbai : लालबाग येथील मसाला गल्ली अतिक्रमणमुक्त; ‘एफ-साऊथ’ विभागाची कारवाई

लालबाग येथील मसाला गल्लीतील रस्त्यावर बेकायदा मसाला विक्री करणाऱ्यांवर शुक्रवारी पालिकेने धडक कारवाई केली.

Swapnil S

मुंबई : लालबाग येथील मसाला गल्लीतील रस्त्यावर बेकायदा मसाला विक्री करणाऱ्यांवर शुक्रवारी पालिकेने धडक कारवाई केली. पालिकेच्या ‘एफ-साऊथ’ विभागाने ही कारवाई केल्याचे विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगळे यांनी सांगितले.

मुंबईतील पदपथांवर, रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी लालबाग मसाला गल्लीतील रस्त्यावर बेकायदा मसाला विक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक कारवाई केली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेला माल गोदामात जमा करण्यात आला आहे. यापुढे बेकायदा फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू राहील, असा इशारा वृषाली इंगळे यांनी दिला आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग