मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस

मुंबई आणि ठाण्यासाठी सोमवारी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, त्यानंतर पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. रविवारी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

प्रतिनिधी

देवश्री भुजबळ / मुंबई :

मुंबई आणि ठाण्यासाठी सोमवारी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, त्यानंतर पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. रविवारी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि शहर व उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अधूनमधून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे सुमारे ३०°C आणि २५°C दरम्यान राहील.

या मोसमात आतापर्यंत मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत एकूण १८८३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी वार्षिक सरासरीच्या ८१.२४% आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत हा पाऊस २६% अधिक आहे.

तर कुलाबा वेधशाळेत आतापर्यंत एकूण १५९०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी वार्षिक सरासरीच्या ७५.९१% आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण ३१% जास्त आहे.

दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पुरेशा पावसामुळे तलावांतील पाणीसाठा समाधानकारकपणे ८६.१८% वर पोहोचला आहे. रविवारी सकाळपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलशय्यांमध्ये १२.४७ लाख दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. या सातही जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर इतकी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले