लिंकिंग रोड अतिक्रमणमुक्त; वांद्रे येथे नॅशनल कॉलेजजवळील पदपथावरील स्टॉल्स हटविले, BMC च्या 'एच' पश्चिम विभागाची धडक कारवाई 
मुंबई

लिंकिंग रोड अतिक्रमणमुक्त; वांद्रे येथे नॅशनल कॉलेजजवळील पदपथावरील स्टॉल्स हटविले, BMC च्या 'एच' पश्चिम विभागाची धडक कारवाई

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सोमवारी वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात आली. फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, तात्पुरते शेडही हटवण्यात आले.

Swapnil S

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सोमवारी वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात आली. फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, तात्पुरते शेडही हटवण्यात आले. पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून फुटपाथवरील बेकायदा बांधकामे आणि स्टॉल्सवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे ‘एच’ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांनी सांगितले.

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सोमवारी वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात आली.

पादचाऱ्यांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत वांद्रे पश्चिम परिसरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. नॅशनल कॉलेज जंक्शनसमोरील ३३ वा रोड तसेच लिंकिंग रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पादचाऱ्यांसाठी मार्ग झाला मोकळा

या परिसरातील फुटपाथवर विविध प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नव्हती. परिणामी नागरिकांना अनेकदा रस्त्यावरूनच चालावे लागत होते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. महापालिका पथकाने परिसराची पाहणी करून फुटपाथवरील अतिक्रमणे हटविली आणि पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

Mumbai : वरळीत BEST च्या धडकेत महिला ठार; कंत्राटी बससेवेचा आणखी एक अपघात

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत