मुंबई

Mumbai : वेस्टर्न रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्या वाढणार, १९ फेब्रुवारीपासून सेवा सुरु

एसी लोकल प्रवासाची लोकप्रियता वाढत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे वेस्टर्न रेल्वेने स्पष्ट केले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांसाठी वेस्टर्न रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारी २०२६पासून वेस्टर्न रेल्वेच्या मार्गावर १२ नवीन एसी लोकल सेवा आणि ३ नॉन-एसी सेवा सुरू होणार आहेत.

एसी लोकल प्रवासाची लोकप्रियता वाढत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे वेस्टर्न रेल्वेने स्पष्ट केले आहे. नव्या सेवांमुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.

१२ एसी लोकल सेवांची भर

वेस्टर्न रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १२ एसी लोकलपैकी ११ सेवा विद्यमान नॉन-एसी लोकलचे रूपांतर असतील, तर एक लोकल पूर्णपणे नवीन एसी सेवा असेल. याशिवाय, ३ नॉन-एसी लोकल सेवांचीही नव्याने भर करण्यात आली आहे.

या बदलांनंतर वेस्टर्न रेल्वे नेटवर्कवरील एकूण एसी लोकल सेवा १२१ वरून १३३ इतक्या वाढतील, तर एकूण लोकल सेवांची संख्या १४१० वरून १४१४ इतकी होईल.

वीकेंडला मोठी सुविधा

माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी धावणाऱ्या एसी लोकल सेवांमध्येही मोठी वाढ केली आहे. एसी लोकल सेवा ७७ वरून थेट १०६ होणार आहेत. यामुळे विकेंडला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहेत.

भाईंदर-बांद्रा लोकल आता विरारपर्यंत

सध्या भाईंदर ते बांद्रा धावणारी स्लो लोकल आता विरारपर्यंत धावणार आहे. यामुळे दूरवरच्या प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. वेस्टर्न रेल्वेने म्हटले आहे की, हा उपक्रम मुंबईकरांना अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी-अनुकूल सेवा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण