मुंबई

पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; अनेक लोकल होणार रद्द, गणेशोत्सवात मात्र प्रवाशांना मिळणार दिलासा

सरासरी सुमारे १००-१४० सेवा रद्द केल्या जातील आणि सुमारे ४० सेवा आठवड्याच्या शेवटी कमी केल्या जातील.

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी २७ ऑगस्टच्या रात्रीपासून ५ ऑक्टोबर या कालावधीत ब्लॉक घेतला आहे. गणेशोत्सव काळात ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गोरेगाव-कांदिवली विभागातील गर्दी कमी करणे, उपनगरीय गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी समर्पित लाइन्स तयार करण्यासाठी गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गिकेचे अंदाजे ४.५ किलोमीटर लांबीच्या विभागाचे काम २७/२८ ऑगस्ट रोजी रात्री सुरू होईल आणि ५/६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी आठवड्याच्या शेवटी पाच मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे ४.५ किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी शनिवार/रविवारी रात्री १० तासांचा ब्लॉक घेऊन कामाला सुरुवात केली जाईल. हे काम ३५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणपती महोत्सवादरम्यान कोणतेही काम केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहावी लाईन टाकण्यासाठी जागा नसल्याने पश्चिमेला नवीन लाईन टाकण्यात येणार असून सध्याच्या सर्व पाच लाइन कट व कनेक्शनद्वारे पश्चिमेकडे हलवण्यात येणार आहेत.

२८/२९ सप्टेंबर आणि ५/६ ऑक्टोबर रोजी गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान लाईन ५ वर नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जाईल. यामुळे वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या ४० ते ४५ मिनिटांसाठी नियमित केल्या जातील.

गोरेगाव-कांदिवली हा भाग वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान पाचवी लाईन सुरू झाली आहे. तसेच खार रोड ते गोरेगाव दरम्यान सहावी लाईन सुरू झाली आहे. गोरेगाव-कांदिवली विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर कांदिवली-बोरिवली विभागात सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीला फायदा होणार आहे.

ब्लॉकचा लाभ

- मुंबई उपनगरीय विभागाची लाईन क्षमता वाढेल.

- व्यस्त उपनगरी आणि मुख्य मार्गावरील ट्रॅकवर रहदारीची घनता कमी केली जाईल.

- गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल.

- या विभागात वांद्रे टर्मिनसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांसाठी दोन समर्पित लाइन असतील.

- मुख्य मार्गावरील गाड्या आणि उपनगरीय गाड्या वेगळ्या केल्या जातील.

- अधिक गाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध असतील.

- अंधेरी-बोरिवली-विरार विभागातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल.

अनेक लोकल रद्द होणार

ब्लॉक कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्या १५ ते २० मिनिटांनी नियमित केल्या जातील. तर उपनगरीय सेवांवरही परिणाम होईल. सरासरी सुमारे १००-१४० सेवा रद्द केल्या जातील आणि सुमारे ४० सेवा आठवड्याच्या शेवटी कमी केल्या जातील. यासाठी पश्चिम रेल्वेने रात्रीच्या कामाचे वेळापत्रक तयार केले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते