संग्रहित छायाचित्र पीटीआय (PTI)
मुंबई

मुंबई लोकल लाईफलाईन नव्हे डेथलाईन; चार महिन्यांत ४८५ जणांचा मृत्यू

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

मुंबईची लोकल रेल्वे ही शहराची ‘लाईफलाईन’ समजली जाते. लोकलमधून रोज ८० लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. आता हीच लाईफलाईन ‘डेथलाईन’ बनल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या अवघ्या ४ महिन्यांत ४८५ जणांचा मृत्यू लोकल मार्गावर झालेला आहे. गेली अनेक वर्षे अनेक प्रवाशांचा रेल्वे प्रवासात किंवा रेल्वे स्थानकावर मृत्यू झाला आहे.

रेल्वे रूळ ओलांडणे, गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून खाली पडणे, रेल्वे खांबांना आदळणे, डब्यांच्या बाहेर लटकणे, लोकल व फलाटाच्या मधील जागेत पडणे, लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना पडणे, विजेचा धक्का लागणे आदी कारणांमुळे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर काही प्रवाशांनी लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे.

यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान मध्य रेल्वेवर २४४ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना, १३६ प्रवाशांचा मृत्यू लोकलमधून पडून, खांबाला आपटून दोन प्रवाशांचा, फलाट व लोकलमध्ये सापडून तीन प्रवाशांचा, तर विजेचा धक्का लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. २१ प्रवाशांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली असून ७५ जणांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला. गेल्या चार महिन्यांत ४८५ जणांचा मृत्यू रेल्वेमार्गात झाला आहे. त्यातील ११० मृतदेहांवर कोणीही दावा केलेला नाही.

गेल्यावर्षी मध्य रेल्वेवर रूळ ओलांडताना ७८२ जणांचा बळी गेला होता. ४३१ प्रवाशांचा मृत्यू लोकलमधून पडून, खांब लागून एका प्रवाशाचा, फलाट व लोकलमध्ये सापडून सात प्रवाशांचा, विजेचा धक्का लागून नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. रेल्वे रुळावर ८२ जणांनी आत्महत्या, तर ३१० जणांचा नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला होता, तर १७ जणांचा अन्य कारणांनी मृत्यू झाला. तसेच ११ प्रवाशांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. २०२३ मध्ये १६५० प्रवाशांचा मृत्यू रेल्वेमार्गात झाला. त्यातील ४३५ मृतदेहांवर कोणीही दावा केलेला नाही.

यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान पश्चिम रेल्वेवर ३०४ प्रवाशांचा मृत्यू झाला. १६२ जणांचा रेल्वे रूळ ओलांडताना, ६५ प्रवाशांचा मृत्यू लोकलमधून पडून मृत्यू झाला. विजेचा धक्का लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. १० प्रवाशांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली असून ५९ जणांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला. विविध कारणांनी सात जणांचा मृत्यू झाला. ९७ मृतदेहांवर अजूनही कोणी दावा केलेला नाही.

२०२३ मध्ये पश्चिम रेल्वेवर ९४० प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी पश्चिम रेल्वेवर रूळ ओलांडताना ४९५ जणांचा बळी गेला होता. १५९ जणांचा लोकलमधून पडून, खांबाला आपटून तीन प्रवाशांचा, फलाट व लोकलमध्ये सापडून तीन प्रवाशांचा, विजेचा धक्का लागून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. रेल्वे रुळावर ३९ जणांनी आत्महत्या, तर २१९ जणांचा नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला होता, तर १७ जणांचा अन्य कारणांनी मृत्यू झाला. तसेच ९ प्रवाशांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. २०२३ मध्ये २८३ मृतदेहांवर कोणीही दावा केलेला नाही.

दावा न केलेल्या मृतदेहांवर पोलीस करतात अंत्यसंस्कार

रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशाचा मृतदेह १४ दिवसांपर्यंत सरकारी रुग्णालयात ठेवला जातो. या काळात नातेवाईक मृतदेहावर दावा करतात. मात्र, कोणी दावा न केल्यास पोलीस त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. पोलीस मृतदेहाचा धर्म ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यानुसार त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस