Mumbai : पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा अपडेट (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा अपडेट

पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मोठा ब्लॉक नसला तरी बोरीवली-भाईंदर दरम्यान रात्री विशेष 'नाईट जंबो ब्लॉक' घेण्यात येणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील विविध रेल्वे विभागांमध्ये आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार, १० मे २०२६ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून काही सेवा रद्दही राहणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मोठा ब्लॉक नसला तरी बोरीवली-भाईंदर दरम्यान रात्री विशेष 'नाईट जंबो ब्लॉक' घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर कुठे आणि किती वेळ ब्लॉक?

माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग

वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५

सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट लोकल गाड्या माटुंगा स्थानकावरून डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान सर्व नियोजित थांबे घेत धावतील. त्यामुळे अंतिम स्थानकावर पोहोचण्यास सुमारे १५ मिनिटांचा उशीर होऊ शकतो.

ठाण्यापुढे जाणाऱ्या फास्ट गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा फास्ट मार्गावर आणण्यात येतील.

तसेच ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट लोकल गाड्याही मुलुंड स्थानकावरून अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान सर्व स्थानकांवर थांबत धावतील आणि नंतर पुन्हा फास्ट मार्गावर आणल्या जातील.

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद

ठाणे - वाशी/नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्ग

वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

'या' लोकल सेवा रद्द

  • ठाण्याहून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ दरम्यान वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.

  • पनवेल, नेरूळ आणि वाशीहून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ दरम्यान ठाण्याकडे येणाऱ्या अप मार्गावरील लोकल गाड्याही रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर 'नाईट जंबो ब्लॉक'

पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नियोजित नसला तरी ९ मे आणि १० मेच्या मध्यरात्री बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान विशेष 'नाईट जंबो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरा रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे अधिकृत मोबाईल ॲप, हेल्पलाइन किंवा स्थानकांवरील घोषणांद्वारे अद्ययावत माहिती तपासावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी येणे सुरूच; समितीची नियुक्ती करणार, हायकोर्टाचे संकेत

India Defence : लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS; व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्याकडे नौदलाची धुरा

ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळून ऑटोचालकाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; VIDEO काढून करत होता ब्लॅकमेल

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड