Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी २.१७ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील व आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी २.५८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील, अशे स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विठु दर्शनाची लागे मज आस! कार्तिकी यात्रेसाठी गजबजली अवघी पंढरी; ४ लाख भाविकांची मांदियाळी, गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांग

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा

आंबेडकर स्मारक रखडले; खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता

नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी' करा - उद्धव ठाकरे

रेसकोर्सवर उद्यानच साकारणार; BMC कडून १२० एकर जागेवरील भूमिगत सुविधांना ब्रेक; इनडोअर खेळ, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव रद्द