Mumbai : महामुंबई मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : महामुंबई मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू

महामुंबई मेट्रोने गणेशोत्सवात मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर रात्री १२.३० वाजेपर्यंत विशेष अतिरिक्त सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : महामुंबई मेट्रोने गणेशोत्सवात मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर रात्री १२.३० वाजेपर्यंत विशेष अतिरिक्त सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत रात्री १२.३० वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. अंधेरी पश्चिम आणि दहिसर पूर्व (मार्गिका २अ), गुंदवली आणि काशीगाव (मार्गिका ७ व ९) तसेच महाराष्ट्र नगर-मंडाळे आणि चेंबूर (मार्गिका २ब) येथून शेवटची मेट्रो रात्री ११ ऐवजी १२.३० वाजता सुटणार आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने भाविक मोठ्या संख्येने नामांकित गणेश मंडळांना भेटी देतात. देखावे, मंडळांना भेटी देत असल्याने सर्वत्र गर्दी होते. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

सोमवार ते शुक्रवार या कालावधीत मार्गिका २अ वर १० विशेष फेऱ्या, मार्गिका ७ आणि ९ वर १४ आणि मार्गिका २ब मार्गिकेवर १५ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत, तर शनिवारी मार्गिका २अ वर १०, मार्गिका ७ आणि ९ वर १४ फेऱ्या मार्गिका २ब वर १५ अतिरिक्त फेऱ्या चालतील तसेच रविवारी मार्गिका २ अ वर १०, मार्गिका ७आणि ९ वर १४ आणि मार्गिका २ब वर १५ फेऱ्या चालतील.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई

Mumbai : आता उद्याने, मैदानांखाली भूमिगत पार्किंग; मुंबई महापालिकेचा निर्णय

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक संशयित अटकेत

मतभेदांचे रूपांतर वादात नको - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी