मृत विवेक गुप्ता  
मुंबई

Mumbai : फटाके फोडण्याचे पर्यवसान खुनात; सायन कोळीवाड्यातील घटना, पाच अटकेत

सायन कोळीवाडा परिसरात फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात विवेक गुप्ता या २२ वर्षीय तरुणाच्या खुनात झाले

एेश्वर्या अय्यर

ऐश्वर्या अय्यर/मुंबई

सायन कोळीवाडा परिसरात शुक्रवारी पहाटे फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात विवेक गुप्ता या २२ वर्षीय तरुणाच्या खुनात झाले आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र नगर, कोकरी आगार येथील एका अरुंद गल्लीत गुप्ता व त्याचे मित्र फटाके फोडत होते. आरोपीने त्यांना दुसरीकडे जाऊन फटाके फोडण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. पुढे हा वाद विकोपाला गेला. नंतर एक आरोपी आपली पत्नी, भाऊ यांना घेऊन घटनास्थळी आला आणि आरोपीने आपल्याकडील धारदार शस्त्राने गुप्ता याच्यावर वार केले. त्यानंतर सर्वच जण घटनास्थळावरून पळून गेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला तातडीने सायन रुग्णालयात हलविले. तथापि, प्राणघातक जखमा व त्यातून खूप रक्तस्त्राव झाल्याने मध्यरात्री ३.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या पाच संशयितांना ताब्यात घेतले असून कार्तिक मोहन देवेंद्र, त्याची पत्नी, कार्तिककुमार देवेंद्र, विकी मुथू देवेंद्र, मिनिअप्पन रवी देवेंद्र अशी आरोपींची नावे आहेत. प्राथमिक चौकशीनंतर पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खून, अवैध जमाव जमवून प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याचा, दंगलीचा, दहशत पसरविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

सत्याच्या मोर्चात असत्याचाच बोलबाला

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ