मुंबई महापालिका (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

Mumbai : महापौरांकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; ठाकरेंचे ३, काँग्रेसचा १, भाजपचे ४ तर शिंदेंचे २ नगरसेवक

यावर्षी मुंबई महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त आली आहे. भाजपच्या वाट्याला ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ तर काँग्रेसला १ स्वीकृत नगरसेवकपद मिळाले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी सर्व १० स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली. बंद लिफाफ्यात दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे आणण्यात आली होती. रितू तावडे यांनी सर्वपक्षीय स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली. यावर्षी मुंबई महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त आली आहे. भाजपच्या वाट्याला ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ तर काँग्रेसला १ स्वीकृत नगरसेवकपद मिळाले आहे.

या स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रत्येक पक्षाकडून कुणाकुणाला संधी दिली जाईल? याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ही नावे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहेत.

भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांमध्ये प्रतीक मधुसदन कर्पे, प्रवीण छेडा, नितेश सिंह, कमलाकर दळवी यांचा समावेश आहे, तर शिवसेनेकडून राज सुर्वे, उमेश माने यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे, कैलास पाठक या तिघांची वर्णी लागली आहे. काँग्रेसकडून वीरेंद्र चौधरी हे एकमेव स्वीकृत नगरसेवक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video