Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश (Photo-X)
मुंबई

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी फूल सिंह कुमार हा गुन्हा घडला तेव्हा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा (अल्पवयीन) होता का, याची शहानिशा करण्याचे निर्देश विशेष एमकोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी/मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी फूल सिंह कुमार हा गुन्हा घडला तेव्हा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा (अल्पवयीन) होता का, याची शहानिशा करण्याचे निर्देश विशेष मकोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी आरोपीच्या वयाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी त्याला तत्काळ बालसुधारगृहात हलवण्याची मागणी मात्र फेटाळून लावली आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला या दाव्याची पडताळणी करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

फूल सिंह व इतर ११ आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. फूल सिंगसह काही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली, तर उर्वरित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, टायगरवील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अजित पवार गटात दिवाळीनंतर धमाका? ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात, शरद पवार गटही भाजपसोबत जाण्याची शक्यता

वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी; महाराष्ट्रासह ७ राज्यांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय

‘गोकुळा’त घमासान सुरूच; नामनिर्देशित पाच संचालक नेमण्याचा मार्ग मोकळा, सहकार कायद्यातील दुरुस्तीचा अध्यादेश जारी

मतचोरीच नव्हे; तर हक्कचोरी; आधार कार्ड नव्हे, मतदार ओळखपत्र महत्त्वाचे? मोदी सरकारची घोषणा म्हणजे मोठे कटकारस्थान - राहुल गांधी

महर्षी फाऊंडेशनला जमीन देण्याचा निर्णय रद्द; उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका, टाटा कंपनीसोबतचा वीजनिर्मिती करार वाऱ्यावर