मुंबई

Mumbai : इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून मेट्रो लाईनचा सन्मान; कोणत्या स्टेशनला प्लॅटिनम दर्जा?

IGBC च्या Green Mass Rapid Transit System (MRTS) रेटिंग प्रोग्राम अंतर्गत परीक्षण केलेल्या स्थानकांमध्ये देशभक्त न.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विकसित केलेल्या मेट्रो लाईन 2B च्या पहिल्या टप्प्यातील सर्व पाच स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून सर्वोच्च प्लॅटिनम (Platinum) रेटिंग मिळाले आहे. पर्यावरणपूरक नियोजन, शाश्वत रचना आणि हरित बांधकाम तत्त्वांचा प्रभावी वापर केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश?

IGBC च्या Green Mass Rapid Transit System (MRTS) रेटिंग प्रोग्राम अंतर्गत परीक्षण केलेल्या स्थानकांमध्ये देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीएसएनएल, मानखुर्द, महाराष्ट्र नगर मंडाळे या पाच मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

कोणत्या निकषांवर मूल्यमापन?

IGBC रेटिंगसाठी या स्थानकांचे ऊर्जा कार्यक्षमतेपासून पाणी संवर्धन, कचरा व्यवस्थापन, शाश्वत बांधकाम साहित्य आणि एकूण पर्यावरणीय प्रभाव अशा विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये या स्थानकांनी उच्च दर्जाचे गुण मिळवले आहेत.

पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर

एमएमआरडीए (MMRDA) च्या माहितीनुसार, या स्थानकांमध्ये ऊर्जा बचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आला असून व्हेंटिलेशनची कार्यक्षम व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच पावसाचे पाणी साठवण्याची सोय, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष प्रणाली आणि पर्यावरणाला पूरक बांधकाम साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

शाश्वततेवर वाढता भर

यापूर्वी मुंबई मेट्रोच्या लाईन 2A आणि लाईन 7 वरील स्थानकांनाही IGBC कडून प्लॅटिनम दर्जा देण्यात आला होता. हे दोन्ही मेट्रो मार्ग कार्बन-न्यूट्रल असल्याचेही प्रमाणित झाले आहेत. त्यामुळे मेट्रो लाईन 2B ला मिळालेला हा सन्मान मुंबईच्या मेट्रो प्रकल्पांमध्ये शाश्वततेवर वाढता भर दर्शवतो.

वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत

MMRDA च्या म्हणण्यानुसार, भविष्यातील सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये हे हरित मानक महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे मुंबईकरांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि ऊर्जा-कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होईल. पूर्व उपनगरांना जोडणारी मेट्रो लाईन 2B ही मुंबईतील मेट्रो विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होईल तसेच रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन