संग्रहित छायाचित्र  
मुंबई

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत लवकरच २ हजार ५०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्यात येईल.

तेजस वाघमारे

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत लवकरच २ हजार ५०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्यात येईल. या लॉटरीत गोरेगाव येथील पत्राचाळीतील घरांचा समावेश करण्यात येणार नसल्याचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणारे नागरिक म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत यावर्षी सर्व गटातील सुमारे ५ हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीतील तब्बल २ हजार ५०० घरांचे काम पुढील वर्षांअखेरीस पूर्ण होणार असल्याने ही घरे मार्च महिन्यात काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

त्यानुसार मार्च महिन्यात विविध उत्पन्न गटातील सुमारे २ हजार ५०० घरांच्या लॉटरी जाहिरात मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे.

लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज भरण्यास महिनाभर वेळ देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची लॉटरी एप्रिल महिनाअखेरीस काढण्याचे नियोजन मंडळामार्फत सुरू आहे. पत्राचाळीतील आर-१ भूखंडावर ३२ मजली तर आर-१३ भूखंडावर ३८ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. तर आर-४ आणि आर-७ या भूखंडांवर प्रत्येकी ३४ मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पात उच्च उत्पन्न गटासाठी १३३, मध्यम उत्पन्न गटासाठी १ हजार २४२ आणि अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३ घरे बांधण्याचे नियोजित आहे.

या लॉटरीत मागाठाणे, प्रतीक्षानगर, विक्रोळी आणि मुंबईतील विविध भागांमधील विखुरलेल्या घरांचा समावेश आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती