मुंबई

उद्या मध्य रेल्वेवर भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

भायखळा आणि शीव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

Swapnil S

मुंबई : भायखळा आणि शीव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे फुट ओव्हर ब्रिजचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले आहेत. पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे. हा ब्लॉक भायखळा आणि परेल दरम्यान अप व डाउन धीम्या व जलद मार्गावर घेण्यात आला आहे. तर दुसरा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे. दादर आणि कुर्ला दरम्यान अप व डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

कर्जत स्थानकात विशेष ब्लॉक

कर्जत स्थानकात प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. कर्जत स्थानकावर २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वेवरील उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करता येणार नाही. मध्य रेल्वेने नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ दरम्यान, कर्जत फलाट क्रमांक ३ ते चौक स्थानकादरम्यान २७ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार