मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई  
मुंबई

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मंगळवारी मोहम्मद अली रोडवरील फुटपाथ ‘अतिक्रमणमुक्त’ची कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेकायदा स्टॉल्स आणि बांधकामे, दुकानांवर हातोडा मारण्यात आला. ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मंगळवारी मोहम्मद अली रोडवरील फुटपाथ ‘अतिक्रमणमुक्त’ची कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेकायदा स्टॉल्स आणि बांधकामे, दुकानांवर हातोडा मारण्यात आला. ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मोहम्मद अली रोड परिसरातील तीन दुकाने, स्टॉल्स हटविण्यात आले. याशिवाय अन्य बेकायदा बांधकामे, दुकानांसमोरील अनधिकृत प्रोजेक्शन्स, ताडपत्री शेड्स तसेच रस्त्यावर व फुटपाथवर अडथळा निर्माण करणारे विविध साहित्य हटविण्यात आले. या कारवाईत देखभाल विभागाचे सहाय्यक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता तसेच परवाना व अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

मुंबईकर पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे सुरक्षित व सुलभ व्हावे यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुंबईतील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी बी वार्डातील मोहम्मद अली रोडच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मंगळवारी मोहम्मद अली रोडवरील फुटपाथ ‘अतिक्रमणमुक्त’ची कारवाई करण्यात आली.

नागरिकांकडून आनंद व्यक्त

दरम्यान, अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार, असा इशारा ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई सुरू असून या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

Mumbai : बीकेसी शॉपिंग मॉलमध्ये तिघा संशयितांना अटक

नेपाळमधील प्रलय ही तर २०५० ची नांदी

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे !