Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग, २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा 
मुंबई

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळ बंद असलेली मुंबई मोनोरेल आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे प्रवासी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली.

Mayuri Gawade

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळ बंद असलेली मुंबई मोनोरेल आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे प्रवासी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली.

ही सुरक्षा मान्यता 'ब्युरो व्हेरिटास' या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल या १९.५४ किमी मार्गावरील सेवा २०२५ मध्ये वारंवार बिघाडांमुळे बंद करण्यात आली होती. आता आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल पुन्हा रुळांवर धावण्यास सज्ज झाली आहे.

सेवा का थांबली होती?

ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये मुसळधार पावसामुळे मोनोरेलची सेवा तीन वेळा बंद पडली होती. १५ सप्टेंबरला तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल अचानक थांबली. त्याआधी १९ ऑगस्टला गर्दीमुळे एक गाडी अडकली होती आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या घटनांनंतर प्रवासी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आणि संपूर्ण व्यवस्था तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यांची तपासणी

एमएमआरडीएनुसार, नवीन रेक्सची आधी उत्पादन केंद्रात तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन महिने वेगवेगळ्या भागांवर चाचण्या घेण्यात आल्या. स्थिर आणि चालू स्थितीतील चाचण्या, तसेच सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीची पडताळणी करण्यात आली. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच सुरक्षा मान्यता देण्यात आली.

२१ नव्या सुविधा

नवीन 'मेड इन इंडिया' रेक्समध्ये २१ बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी आसनव्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, मार्ग दाखवणारे डिजिटल नकाशे, सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा उपाय, मेट्रोसारखी अंतर्गत रचना आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली देण्यात आली आहे.

अंतिम तपासणीनंतरच सेवा

आता संपूर्ण मार्गाची अंतिम तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पाहणी करणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोनोरेलची प्रवासी सेवा अधिकृतपणे पुन्हा सुरू होईल.

सुधारित आणि अधिक सुरक्षित सुविधांसह मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं