Mumbai : मृणालताई गोरे विस्तारित पूल महागला; प्रकल्प खर्च २४८ कोटींवर, स्थायी समितीत उद्या चर्चा 
मुंबई

Mumbai : मृणालताई गोरे विस्तारित पूल महागला; प्रकल्प खर्च २४८ कोटींवर, स्थायी समितीत उद्या चर्चा

गोरेगाव येथील मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिमपर्यंतच्या रिलीफ रोडपर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ३० एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव येथील मृणालताई  गोरे  रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिमपर्यंतच्या रिलीफ रोडपर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च  २४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ३० एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष  वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.

दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पूल विभागामार्फत या विस्तारित पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती आणि २२ मार्च २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे.  या कामासाठी  एमईपीएल-ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकल्पाचा कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग