मुंबई

अभियंता विभागाच्या परीक्षेत घोटाळा? महापालिकेच्या नगर अभियंता खात्याची परीक्षा वादात

मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता खात्यामार्फत २३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या दोन्ही संवर्गाला सारखीच प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता खात्यामार्फत २३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या दोन्ही संवर्गाला सारखीच प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यामुळे दुय्यम अभियंत्यांच्या गुणसंख्येवर परिणाम होणार आहे. सदर परिक्षेत असंबंध/ अतार्किक/नियमबाह्य पद्धतीने प्रश्न विचारल्यामुळे अभियंता वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा आरोप म्युन्सिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष रमेश उतेकर - देशमुख यांनी केला आहे.

मुंबई नगर अभियंता खात्यामार्फत २३ जानेवारी २०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये 'अ' गटातील खात्यामध्ये नियुक्तीकरिता २५ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. सदर परिपत्रक क्र. ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुय्यम अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गाकरीता वेगवेगळी प्रश्नपत्रिका अपेक्षित होती. परंतु प्रत्यक्षात दोन्ही संवर्गाला सारखीच प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे समस्त दुय्यम अभियंता संवर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. पालिकेने विचारलेले

१. What is contract cost for Milan Subway work?

२. How many agency appointed for Desilting of Mithi River in 2024-25?

उपरोक्त दोन प्रश्न फक्त पर्जन्य जलवाहिनी खात्यातील अभियंत्यांशी सबंधीत असून ते प्रश्न अन्य खात्याच्या अभियंत्यांना विचारण्यात आले. ज्याची उत्तरे इतर खात्याच्या अभियंत्यांना माहीत असणे अपेक्षित नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे दक्षता विभागाच्या कामकाजाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही इतर खात्याच्या अभियंत्यांकडून अपेक्षित नसून इमारत प्रस्ताव विभाग व झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या अनुषंगाने प्रश्नावली अपेक्षित होती.

प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर महापालिकेतील कोणत्याही अभियांत्रिकी खाते प्रमुखाशी सल्लामसलत न केल्याचे निदर्शनास आल्याचे उतेकर यांनी सांगितले. तसेच चुकीच्या ४ प्रश्नांकरिता सर्व अभियंत्यांना ४ गुण बहाल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, नगर अभियंता खाते व आयबीपीएस यांच्यामधील ई-मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार लिक झाला आहे. त्यातील उल्लेख केलेला परीक्षेसंदर्भातील अभ्यासक्रम व आलेले प्रश्न यामध्ये साम्य आढळत असून सदर बाब अत्यंत धक्कादायक स्वरूपाची असल्याची सांगत सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उतेकर यांनी केली. तसेच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. असेही ते म्हणाले.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल