मुंबई

तीन ब्रेन-डेड रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अवयवदान; अनेकांना मिळाले जीवनदान; मुंबईत सामाजिक जाणिवेचे दर्शन

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अवयवदानाबाबत वाढती जनजागृती गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाली. तीन ‘ब्रेन-डेड’ (मृत्युमुखी पडलेल्या) रुग्णांच्या कुटुंबीयांनी पुढे येत या उदात्त कार्याला पाठिंबा दिला. त्यांच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. दान केलेल्या अवयवांमध्ये यकृत, मूत्रपिंड, नेत्रपटल आणि अस्थींचा समावेश आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अवयवदानाबाबत वाढती जनजागृती गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाली. तीन ‘ब्रेन-डेड’ (मृत्युमुखी पडलेल्या) रुग्णांच्या कुटुंबीयांनी पुढे येत या उदात्त कार्याला पाठिंबा दिला. त्यांच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. दान केलेल्या अवयवांमध्ये यकृत, मूत्रपिंड, नेत्रपटल आणि अस्थींचा समावेश आहे.

‘झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ४३ वर्षीय मेहुल करारीया यांना ‘ब्रेन-डेड’ घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली तर नेत्रपटल तसेच अस्थीही रुग्णांसाठी पाठवण्यात आल्या.

ब्रेन स्ट्रोकने मृत्यू

मेहुल यांना कोणताही पूर्वआजार नव्हता. २९ मे च्या रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. चार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे स्पष्ट झाले.

वर्षभरातील अठ्ठाविसावे अवयवदान

‘झेडटीसीसी’ मुंबईच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या या तीन अवयवदानांमुळे मुंबई क्षेत्रात वर्ष २०२६ मधील मरणोत्तर अवयवदानाची एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे.

महिलेने यकृत, नेत्रपटलाचे केले दान

मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्येच एका ६९ वर्षीय महिलेला ब्रेन-डेड घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे यकृत आणि नेत्रपटल दान करण्यात आले. गोव्यात राहणाऱ्या त्यांच्या मुलाने, मुंबईतील कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या आपल्या भावाच्या पाठिंब्याने या अवयवदानाला परवानगी दिली.

अवयवदान मोहिमेला पाठिंबा

मेहुल हे भानुशाली समाजाचे होते, ज्या समाजाला अवयवदान मोहिमेला पाठिंबा देण्याचा मोठा इतिहास आहे. समाजातील ज्येष्ठ सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंती दामा म्हणाले की, शक्य असलेले सर्व १३ अवयव आणि ऊती दान करण्याची कुटुंबीयांची तयारी होती. डॉ. दामा यांनी सांगितले, ‘मेहुल स्वतः अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात सक्रिय होते. त्यांच्या या उदात्त कार्याने अवयवदानाच्या मोहिमेप्रती समाजाची कटिबद्धता पुन्हा एकदा दृढ केली आहे.’

मुलुंडमधील वृद्धाचे अवयवदान

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ८५ वर्षांच्या वृद्धाला ब्रेन-डेड घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. त्यांचे यकृत एका गरजू रुग्णाला देण्यात आले. त्यांच्या पत्नी आणि ठाण्यात केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या दोन मुलांनी हे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान