ANI
ANI
मुंबई

चुनाभट्टीत चाळीवर कोसळली दरड; तिघे जखमी

प्रतिनिधी

पावसाने हजेरी लावल्यास सुरुवात केल्यानंतर मुंबईत पडझडीचे सत्र सुरु झाले आहे. सायनमधील चुनाभट्टी परिसरात नारायण हडके चाळीवर बुधवारी सकाळी दरड कोसळली. यात तिघे जण जखमी झाले. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेले तीन दिवस पावसाचा जोर कायम असून आज सकाळीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुंबईत पाऊस सुरू असताना सायन येथील नागोबा चौक येथे एक मजली नारायण हडके चाळीवर सकाळी साडेदहाच्या सुमाराला दरड कोसळली. यात शुभम सोनावणे (१५), प्रकाश सोनावणे (४०) आणि सुरेखा गिरकर (२०) जखमी झाले. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असूूून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणूून दरड कोसळलेल्या घराच्या आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल